Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

धंगेकर गिरवणार कसब्याचा निवडणूक आयोगाकडे घेतली धाव...

धंगेकर गिरवणार कसब्याचा निवडणूक आयोगाकडे घेतली धाव...

पुणे : लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर काढणार आणि त्याचा वापर पुण्याच्या निवडणुकीमध्ये करणार असल्याचा आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर आता धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी केली आहे.

कसबा पोटनिवडणुकी दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करत मतदाना दिवशीच सपत्नीक आंदोलन केलं होतं. यामुळे मतदानादिवशी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती होऊन त्याचा फायदा कुठेतरी रवींद्र धांगेकर यांना झाल्याचं पाहायला मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील धंगेकरांकडून अशाच प्रकारचे आरोप केले असून आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. वरील चारही मतदारसंघात निवडणूक आचार संहिता ढाब्यावर बसवून झोपडपट्टी भागात सर्रास दारू व पैसे वाटप होत आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार सद्यस्थितीत नागरिकांना धमकावत असून मतदान करण्यास प्रतिबंध करत आहेत. असं निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात धंगेकरांनी म्हटलं आहे.


Post a Comment

0 Comments