पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा...
पुणे : लोखसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे मतदारसंघात झालेल्या मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दोनच दिवसांपूर्वी धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजपविरुद्ध आंदोलन केले होते.
पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी सहकारनगर परिसरात मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात असून पोलीस मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. तसंच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ निर्माण झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली होती. जवळपास मध्यरात्रीपर्यंत गोंधळ सुरू होता.
Post a Comment
0 Comments