बायकोसोबत झालेल्या वादातून कारची तोडफोड...
पुणे : बायकोशी झालेल्या वादातून एकाने सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या चारचाकी गाडीची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी रेल्वेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार रविवारी (दि.१२) घोरपडी गावातील जयहींद चौकातील सार्वजनिक रोडवर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबबात आबुबखर नासीर खान (वय-५० रा. जयहिंद चौक, घोरपडी गाव, पुणे) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रदीप सुरेश चितारे (वय-४२ रा. रेल्वे क्वॉटर्स, घोरपडी, पुणे) याच्यावर आयपीसी ४२७ नुसार गुन्हा दाखल करुन मुंबई पोलीस अॅक्ट १४९ नुसार नोटीस दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची कार जयहिंद चौकातील सार्वजनिक रोडवर पार्क केली होती. फिर्यादी यांचा ओळखीच्या तरुणाने फोन करुन एका अनोळखी व्यक्तीने कारची पुढील काच फोडल्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी कारजवळ येऊन आरोपीला पकडून घोरपडी पोलीस चौकीत आणले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रदीप चितारे याने रेल्वेमध्ये काम करत असल्याचे सांगितले.
Post a Comment
0 Comments