Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

घाटकोपरमधील घटनेनंतर पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर...

घाटकोपरमधील घटनेनंतर पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर...

पुणे : सोमवारी मुंबई वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या होर्डिंगमुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

जवळपास १०० लोकं या होर्डिंगखाली दाबली गेली होती. अनेकांना यामधून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट झाली आहे. पुणे शहरात एकूण १५६४ अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे.

पुणे महापालिकेची धडक कारवाई

मुंबईत घडलेल्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आहे. शहरतील सगळ्या होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शहरात एकूण २५०० होर्डिंगस असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्तांनी दिली आहे. जर अनधिकृत असेल तर त्याच लायसन्स रद्द करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

२५०० परवानग्या आहेत तेवढेच अधिकृत होर्डिंगस असून अनधिकृत असेल तर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. शहरात एकूण २५९८ अधिकृत होर्डिंगस आढळले आहेत. तर २३०० होर्डिंगसचं ऑडिट झालं आहे. एकूण १५६४ अनधिकृत होर्डिंगसवर पुणे महानगरपालिकेची कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments