नोकरीच्या आमिषाने ९ जणांना ४१ लाखांचा गंडा गुन्हा दाखल...
पुणे : कोल इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९ जणांना ४१ लाख १८ हजारांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, खडकी पोलिसांनी, धनंजय लक्ष्मण कारखानीस, तुषार धनंजय कारखानीस, रोहित धनंजय कारखानीस यांच्यासह अन्य दोघे अशा पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संदीप बबन इंदलकर (५१, रा. रघुकूलनगरी, औंध रोड, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते मे २०२३ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदलकर आणि आरोपी कारखानीस हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सुरुवातीला धनंजय आणि तुषार या दोघांनी रोहित याला नोकरी लावण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून इंदलकर यांच्याकडून १ लाख ८७ हजार रुपये घेतले. मात्र त्यांनी ते पैसे मुदतीत परत केले नाहीत. दरम्यान, ऑगस्ट २०२१ मध्ये कोल इंडियात कोविडमुळे जागा रिकाम्या झाल्या असून, त्या भरायच्या आहेत. तुमच्या मुलीला तेथे नोकरी लावतो असे सांगून इंदलकर यांच्याकडून १६ लाख ६३ हजार रुपये घेतले.
Post a Comment
0 Comments