विश्रांतवाडी परिसरात बसशेड नसल्याने प्रवाशांना उन्हात थांबण्याची वेळ येत आहे,
सोमनाथ साळुंके
पालिका पीएम्पीएमएल विभागामार्फत अनेक ठिकाणीं बसशेडची उभारणी करण्यात आली नसून तर काही ठिकाणी एकाच जागेवर तीन तीन बसशेड उभारण्यात आल्याने या कामात घोटाळा झाल्याची शंका नागरिकांमधून व्यक्त होत असून याबाबत प्रवाशांकडून प्रशासनाच्या विरोधात नाराजी पसरून कभी खुशी तर कभी गमचे वातावरण दिसून येत आहे.
यासंदर्भात दैनिक सिविंक मिरर वृत्तपत्राने घेतलेला आढावा पुढीलप्रमाणे सध्या पालिका पीएमटी बसेस विभागाचा विस्तार हा खेडोपाडी पोहोचल्यामुळे या विभागास महिन्याला कोट्यवधी रुपयांचा फायदा होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांच्या कानावर येत आहे.मात्र या विभागाकडून नागरिकांचे प्रश्न सोडविणे देखील तितकेच गरजेचे आहे.मात्र पीएमटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनामनी कारभाराचा फटका विनाकारण प्रवाशांना सहन करण्याची वेळ येत आहे.सध्या शहरासह उपनगर भागातील प्रवाशाबाबत असलेले चित्र वेगळे दिसून येत आहे.विश्रांतवाडी या उपनगर भागातून पुणे शहरासह,येरवडा,श्री क्षेत्र आळंदी व आंतरराष्ट्रीय लोहगाव विमानतळाकडे मार्ग जात असल्याने या मार्गावर वाहनासह कामगार वर्गांची वर्दळ ही नेहमीच दिसून येत आहे.येथील मुख्य चौकातून लोहगाव व येरवडा भागाकडे मार्ग जात असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशाकरिता खात्यातर्फे बसेसची सुविधा करण्यात आली असून येथील मुख्य चौकातच नागरिकांच्यासाठी बसशेडची सुविधा करण्यात आली होती.मात्र दोन महिन्यापूर्वी रस्तारुंदिकरणात असलेले बसशेडच गायब केल्याने प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात बसेसची वाट भर उन्हात पाहण्याची वेळ येत आहे.यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा देखील प्रामुख्याने समावेश दिसून येत आहे.तर टिंगरेनगर,नागपूरचाळ,जेलरोड या भागात देखील अशा प्रकारची परिस्थिती असून पावसाळ्यात प्रवाशांची अतिशय बिकट परिस्थिती दिसून येत आहे.अनेक भागात बसशेडच नसल्याने प्रवाशांना भर पावसात बसेसची वाट पाहण्याची वेळ येत असल्याने पीएमटी खाते हे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.__
येरवड्यात अवैध रिक्षाचालकांचा विळखा
येरवडा भागात इतर उपनगर भागाकडे प्रामुख्याने मार्ग जात असल्याने या ठिकाणी गाडीतळ येथे लाखो रुपये खर्च करून बसशेड उभारण्यात आले आहे.मात्र असलेले बसशेड हे रस्त्यापासून काही अंतरावर उभारण्यात आले आहे.पण ह्या ठिकाणी बसस्टॉपला अनेक अवैध रिक्षाचालकांनी विळखा घातल्याने नागरिक यांच्यासह महिला प्रवाशांना विनाकारण याचा त्रास सहन करण्याची वेळ येत आहे.रिक्षानी घातलेल्या विळख्यामुले शहरातून येणाऱ्या बसेसचा अनेकदा अंदाज येत नसल्यामुळे अनेकदा बसेस निघून जात असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत या ठिकाणी थांबण्याची वेळ येत आहे.______ बसशेड बनले टवाळ युवकांचा अड्डा_
येरवडा गावठाण परिसरात प्रवाशाकरिता जरी पीएमटी बसस्टॉप उभारण्यात आले असले तरी पण रस्त्यापासून काही अंतरावर हे बसशेड असले तरी पण या ठिकाणी सर्रासपणे टवाळ युवकांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत असून असलेले बसशेड हे टवलांचा अड्डाच बनल्याने अनेक महिला प्रवाशी ह्या युवकांच्या भीतीपोटी त्या रस्त्यावर उभे राहण्यास पसंती देत आहे.याबरोबरच अनेक दारुड्यांचा वावर परिसरात जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खात्यामार्फत कोणतीच उपाय योजना करण्यात न आल्याने महिलांमध्ये पीएमटी प्रशासन विरोधात नाराजीचे सूर उमटत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज देखील ऐरणीवर आला आहे._____&
ठिकाणी दोन ते तीन बसशेड____
विश्रांतवाडी परिसरातील बसडेपोच्या हाकेच्या अंतरावर कोणत्याही बसचा थांबा नसतांना देखील या ठिकाणी एक नव्हे तर दोन अनधिकृतपणे बसशेड उभारले असून त्यावर खात्या तर्फे विविध खाजगी कंपन्यांची जाहिरातबाजी करण्यात आल्याने उभारण्यात आलेले पीएमटी विभाग फक्त खात्याचा फायदा होण्याच्या दृष्टीने हे बसशेड उभारण्यात आले आहे का?असा संतप्त सवाल प्रवाशांकडून करण्यात येत असताना अशा कामात घोटाळा झाल्याची शंका नागरिकात व्यक्त होत आहे.तर टिंगरेनगर,येरवडा परिसरातील बदामी चौक येथील अनधिकृत उभारलेले बसथांबे दोन असताना देखील एका राजकीय नेत्याने राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या दोन्ही ठिकाणी स्वखर्चातून बसशेड उभारून स्वत ची जाहिरातबाजी करत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.ज्या ठिकाणी प्रवाशांना बस शेडची गरज असताना अशा भागात बसशेड नसल्याचे निदर्शनास येत असताना देखील पी एमटी खात्याकडून काही ठिकाणी दोन ते तीन बस शेड उभारण्यात आल्याने यासाठी केलेला खर्च विनाकारण पाण्यात गेला असल्याचे म्हणण्याची वेळ प्रवाशावर आली आहे.तरी प्रवाशांची मुख्य समस्या लक्षात घेऊन ज्या ठिकाणी प्रवाशांच्या दृष्टिकोनातून बसशेड नाही अशा ठिकाणी बसशेड उभारण्यात यावेत जेणे करून सर्वसामान्य प्रवाशी मोकळा श्वास घेतील अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे._______
टिंगरेनगर,विश्रांतवाडी व बदामी चौक येथे दोन अथवा तीन अनधिकृत उभारलेले बसशेड
पंधरा वर्षापूर्वी वडगाव शेरी भागातील सोपाननगर परिसरात बस जात नसतांना देखील एका पक्षातील माजी नगरसेवकाने या ठिकाणी बस जात असल्याचा खोटा नकाशा पालिकेला दाखवून लाखो रुपयांचा या नावाखाली मलिदा लाटून पालिकेची फसवणूक केली होती.मात्र हे प्रकरण उजेडात येताच नगरसेवकाने मीडिया समोर हात जोडले होते.__ज्या भागात डबल बसशेड उभारण्यात आले आहे. व ज्या ठिकाणी बसशेड नाही या सर्व घटनेचा सर्व्हे करण्यात आला असून याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.__नारायण करडे__बस डेपो मनेंजर_______ज्या भागात प्रवाशाकरिता एक सोडून दोन बसशेड उभारण्यात आले आहे.अशा कामात नक्कीच घोटाळा झाल्याची शंका येत असून दोषी आढळणाऱ्या पीएमटी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.__निरंजन मराठे__सामाजिक कार्यकर्ते_____
प्रवाशांना बसशेड काही भागात नसल्याने त्रास होत आहे.यामुळे अशा ठिकाणी बसशेड उभारण्यात यावेत.__जितेंद्र जगताप_सामाजिक कार्यकर्ते_____
Post a Comment
0 Comments