Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

अतिक्रमणचा पथारी व्यावसायिकावर कारवाईचा बडगा,परवानाधारक व्यावसायिकावर ही कारवाई

        सोमनाथ साळुंके
पालिका अतिक्रमण विभागाकडून परवानाधारक व्यावसायिकावर कारवाईचा बडगा उगारून कारवाई करण्यात आल्याने अतिक्रमण विभागाकडून उचललेल्या कारवाईच्या पावलामुळे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
    विश्रांतवाडी भागात खाजगी व्यावसायिकांचे जाळे पसरून या ठिकाणी विविध व्यावसायिकांची दुकाने थाटल्याने संध्याकाळच्या दरम्यान परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.यामुळे परिसरात ग्राहकांची वर्दळ ही नेहमीच मोठ्या प्रमाणात दिसून येत असली तरी पण यापूर्वी अनेक व्यावसायिकाकडे पथारी व्यावसायिकाचा परवाना नसल्याने यापूर्वी अतिक्रमण विभागाकडून होणाऱ्या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सुर उमटत होते.त्यातच अनेक व्यावसायिकांनी बँक अथवा खाजगी सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन व्यवसाय थाटल्याने असणारे कर्ज फेडणे त्यांच्यासमोर एक प्रकारचे आव्हान असताना होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमुळे अनेक व्यावसायिक हे अडचणीत आले होते.त्यामुळे पथारी व्यावसायिकांची मुख्य समस्या समजून व कारवाई टाळण्याच्या उद्देशाने या भागातील विविध पथारी व्यावसायिकांना पालिकेच्या वतीने पथारी व्यवसायाचे परवाने देण्यात आले असताना या भागातील पथारी व्यावसायिक यांच्याकडे जवळपास तीन ते चार कोटी रुपयांची थकबाकी थकीत आहे.तरी अतिक्रमणकडून जवळपास.दोन ते तीन लाख रुपये थकीत बाकी वसूल करण्यास यश आले असले तरी पण सोमवारी(आज)देशाचे पंतप्रधानपद नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा असल्याने पोलीस यंत्रणेसह शहरातील विविध भागात अनेक व्यावसायिकावर कारवाई सुरू असताना रविवार (दि.२८)रोजी सुट्टीचा दिवस असताना देखील पालिका अतिक्रमण विभागाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती.विशेष म्हणजे अनेक व्यावसायिकांचे पालिकेचे व्यवसायाचे परवाने असताना देखील अशा व्यावसायिकावर कारवाई करण्यात आल्याने परिसरात अधिकाऱ्यांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होऊन चर्चेचा विषय बनला होता.यादरम्यान आळंदी मार्गावरील कळस परिसरात एका थंड पेय         कळस येथे कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे पथक
व्यावसायिकावर परवाना असताना देखील त्यांच्यावर कारवाई सुरू होती.विशेष म्हणजे यावेळेस एक वयस्कर वृध्द व्यक्ती अधिकाऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न करत असताना देखील अधिकाऱ्यांना त्यांची थोडीशी देखील माया न आल्याने या वृध्द व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते.यादरम्यान या ठिकाणी जमलेल्या नागरिकामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती.तर एका रस्त्यावर विक्री करणाऱ्या फिरत्या रसवांतीगृह व्यावसायिकावर देखील कारवाई करण्यात आली.यावेळी अधिकारी हे पंतप्रधानांचे नाव पुढे करून कारवाई करत असल्याने परिसरात हा एक चर्चेचा विषय बनला होता.याबाबत येरवडा,धानोरी,कळस क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त चंद्रसेन नागटिळक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.कारवाई दरम्यान सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले होते._____

Tags

Post a Comment

0 Comments