चोरट्यांनी लांबवीले ७८२ ग्रॅम दागिने...
पुणे : सिंहगड रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या पुण्यातील प्रख्यात डॉक्टरच्या घरात चोरट्यांनी हात साफ केला आहे. चोरट्यांनी बेडरूममधील कपाट तोडून तब्बल ७८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली.
ही रक्कम ४४ लाख रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
घरफोड्यांचे सत्र हळूहळू वाढू लागले आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि विकेंडचे दिवस साधून अनेकजण सहलीचे नियोजन करीत आहेत.शिवाय लग्नाच्या तारखा देखील असल्याने परिवार घर बंद करून बाहेर पडत असतात. त्याचा गैरफायदा चोरटे घेताना दिसत आहेत. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ. चंद्रकांत आठल्ये आणि त्यांचा मुलगा सचिन आठल्ये हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यानी हात साफ केला आहे.
पोलिसात तक्रार
सदर चोरीची घटना २७ एप्रिलला संध्याकाळी सव्वापाच ते २८ एप्रिल दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी डॉ. चंद्रकांत मधुसूदन आठल्ये (वय ६८, रा. सफलानंद सोसायटी, संतोष हॉलजवळ, आनंदनगर, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्याआधारे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments