Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार...

पुणे : तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून  तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

यातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गोळ्या खाण्यास देऊन तिचा गर्भपात केला. हा प्रकार सन २०२१ ते एप्रिल २०२४ या कालावधीत कोरेगाव पार्क आणि विमाननगर येथील स्पा सेंटरमध्ये घडला आहे.

याबाबत पीडित २२ वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.२५) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गजानन दत्ता आडे (वय-२७ रा. नांदेड) याच्यावर आयपीसी ३७६/2/एन, ३१३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन आडे हा कोरेगाव पार्क आणि विमाननगर येथे स्पा सेंटर चालवतो. तर पीडित तरुणी त्याच्या स्पा सेंटरमध्ये कामाला होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. आरोपीने तरुणीला जबरदस्तीने गोळ्या खाण्यास देऊन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भारती इंगोले करीत आहेत.



Post a Comment

0 Comments