दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त...
पुणे : पुण्यासह वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतीच्या कंपन्यांमध्ये दरोडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.
दरोडा व वाहन चोर विरोधी पथक दोनने त्यांना पकडले असून, त्यांच्याकडून एक टेम्पो, एक दुचाकी गाडी, एक कटर असा ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अब्दुल कलाम रहेमान साह ( वय २४, रा. चिखली), प्रेमसागर सुमीरन कनोजिया (वय १९), शकील अहमद मन्सुरी (वय २४), रिजवान उर्फ अहमद रामुल्ला खान (वय १९), सोमनाथ गणपत कोडीतकर (वय ३८), अनिल अनंता रेणुसे (वय ३४, रा. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, राजेश लोखंडे, संदीप येळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
शहरात लुटमारीसोबतच दरोड्याचे प्रयत्न दरोडे टाकले जात आहेत. वाढत्या स्ट्रीट क्राईमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. तर, चोरट्यांवर लक्ष ठेवले जात आहे. यादरम्यान, रामटेकडीतील आद्योगिक वसाहतीत हारको ट्रान्सफॉर्मस असणाऱ्या कंपनीवर दरोडा टाकला होता. दोन सुरक्षा रक्षकांना दोरीने बांधून हा दरोडा टाकला होता.
Post a Comment
0 Comments