सवलतीत कर भरण्यास पुणेकरांचे प्राधान्य...
पुणे : मिळकतकर दि. ३१ मेपूर्वी भरणाऱ्यांना महापालिकेकडून सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. याचा लाभ घेण्यासाठी पुणेकर प्राधान्य देत असून, गेल्या २६ दिवसात महापालिकेच्या तिजोरीत तब्बल २५३ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे.
मागील वर्षी याच कालावधीत निवासी मिळकतींच्या ४० टक्के सवलतीचा गोंधळ सुरू असल्याने अवघा २५ कोटींचा कर जमा झाला होता. दरम्यान, महापालिकेकडून मिळकतकराच्या बिलांचे वाटप पूर्ण झाले असून या दोन महिन्यांतच महापालिकेस जवळपास हजार ते १२०० कोटींचा कर जमा होण्याची प्रशासनास अपेक्षा आहे.
महापालिकेकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात २५ हजारांपर्यंत मिळकतकर असणाऱ्या नागरिकांना १० टक्के, तर त्यापेक्षा जास्त रकमेचा मिळकतकर असल्यास ५ टक्के सवलत दिली जाते. या शिवाय, या कालावधीत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेकडून १ कोटी रुपयांपर्यंतच्या बक्षिसांची योजनाही राबविण्यात येते. त्यामुळे पुणेकरांकडून या कालावधीत कर भरण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.
Post a Comment
0 Comments