महापालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षक मारहाण प्रकरण...
पुणे : महापालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना मारहाण करणार्या उपअभियंत्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून या संबंधीच्या कारवाईची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यात महापालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारात एका उपअभियंत्याकडे तृतीयपंथी सुरक्षारक्षकांनी ओळखपत्राची मागणी केली. त्यावर संबंधित अभियंत्याने तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करून मारहाण केली.
या घटनेनंतर महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने संबंधित उपअभियंत्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर विविध सामाजिक संस्था व संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेत या अभियंत्याचे निलंबन करण्याची मागणी आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. त्यानुसार प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. म्हणाले, सीसीटीव्ही तपासणी करून सुरक्षारक्षकांचा जबाबही नोंदविला आहे. त्यानुसार कारवाईबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments