मी मंत्री झालो तर महेश मांजरेकर राजकारणात येणार...
पुणे : सिनेक्षेत्रातील काही व्यक्ती राजकारणात आपलं नशीब आजमावत आहेत. राजकीय क्षेत्रात बरेच अभिनेत्री, अभिनेते आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकरसुद्धा राजकारणात येण्याच्या तयारीत आहेत का?
असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
महेश मांजरेकर जुनं फर्निचर हा नवा कोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 26 एप्रिलला ही फिल्म चित्रपटगृहात प्रदर्शित झाली आहे. मांजरेकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर हजेरी लावली. तिथं महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर त्मयांनी आपलं मत मांडलं.
मंत्री हवा बारावी पास
महेश मांजरेकर म्हणाले, जो देश चालवतो तो निदान बारावी पास तरी हवा. एखाद्या कार्यालयात शिपायाची जागा असेल त्यालाही बारावीची पात्रता लागते. शिपाई बारावी पास असावा अशी अपेक्षा करता मग तुम्ही तर देश चालवणार आहात. देश आहे, तर तुम्ही नियुक्त्या करता. आज ज्याने बॅट उचलली नाही तो क्रीडामंत्री असतो. एखादा डॉक्टरला आरोग्यमंत्री, शिक्षकाला शिक्षणमंत्री करा ना. हे एक मॉडेल म्हणून करायला काहीच हरकत नाही.
मी मंत्री झालो तर...
मांजरेकरांनी आपण मंत्री झालो तर काय करून याबाबतही सांगितलं आहे. "मला सांस्कृतिक मंत्री केलं तर आवडेल. सांस्कृतिक मंत्री झाल्यावर अगोदर सबसिडी बंद करेन. तेच पैसे थिएटर बनवायला वापरू. राज्यात चित्रपट व्यवसाय वाढवायचा असेल तर थिएटर वाढवायला हवेत. छोट्या-छोट्या गावात थिएटर हवे. तिथे शंभर प्रेक्षक बसतील, असे थिएटर बांधा. तिथंच एक फूड मॉल तयार करा. घरात लागणाऱ्या सर्व वस्तू मिळती असा मॉल करा, एक कॉफी शॉपही बनवा. तरच त्या ठिकाणी लोकांची गर्दी होईल आणि त्यातूनच रोजगारही मिळेल", असं ते म्हणाले.
जुनं फर्निचर चित्रपटाबाबत
सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे. सिनेमात स्वत: महेश मांजरेकर प्रमुख भूमिकेत आहेत.
Post a Comment
0 Comments